भुसावळात किरकोळ वादातून तरुणावर चाकूहल्ला : आरोपीला अटक
Youth stabbed over minor dispute in Bhusawal: Accused arrested भुसावळ (13 डिसेंबर 2024) : किरकोळ वादातून शहरातील 24 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील पंचशील नगरात 10 रोजी रात्री 10.30 वाजता घडली. संशयीताला अटक करण्यात आली.
असे आहे चाकू हल्ला प्रकरण
अमन विनायक जामनकर (24, पंचशील नगर, मदिना मशिदीमागे, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 10 रोजी रात्री 10.30 वाजता पंचशील नगरातील राजू वानखेडे यांच्या दुकानासमोर काहीएक कारण नसताना संशयीत रोहित उर्फ बाळा सोनवणे (पंचशील नगर, भुसावळ) याने तू आज कल बहुत उडने लगा है, तु बच्चा है, बच्चे जैसे रहा कर, असे बोलून शिविगाळ केली. तक्रारदाराने काय झाले असे विचारले असता संशयीताने त्याच्याकडील चाकू फिर्यादीच्या डाव्या छातीवर मारून पळ काढला. या घटनेत जामनकर हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर संशयीताला बुधवारी अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धूमाळ करीत आहेत.


