बोदवड शहरात 18 लाखाचा गुटखा जप्त : एकाला अटक


बोदवड (13 डिसेंबर 2024) : मध्यप्रदेशातून छत्रपती संभाजीनगराकडे होणारी गुटख्याची वाहतूक बोदवड पोलिसांनी रोखत तब्बल 18 लाखांचा गुटखा जप्त केला असून एकाला अटक केली आहे. ही कारवाई 12 रोजी सकाळी करण्यात आली.

18 लाखांचा गुटखा जप्त : चालकाला अटक
मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर शहराकडून बोदवडमार्गे छत्रपती संभाजी नगराकडे चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच.20 जी.झेड. 0472) ची पहाटे पाच वाजता जामनेर रस्त्यावरील गो शाळेजवळ अडवूत तपासणी केली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा आढळला. 18 लाख 56 हजार 80 रुपयांच्या गुटख्यासह वाहन जप्त करण्यात आले.

कॉन्स्टेबल विजय अर्जुन पाटील यांच्या फिर्यादीवरून चालक राकेश अरुण नवगिरे व वाहक योगेश लहू लोखंडे (दोन्ही रा.बोकुड, जि.जळगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हे वाहन योगेश लहू लोखंडे (रा.बोकुड, जि.जळगाव) यांच्या मालकिचे असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड उपनिरीक्षक सुधाकर शेजोळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !