तुमच्याकडीलही शंभराची नोट बनावट नाही ना ! सावद्यात बनावट नोटांसह दोघांना अटक


Two arrested with fake notes in Sawada सावदा (13 डिसेंबर 2024) : सावदा पोलिसांनी बनावट नोटा बाळगणार्‍या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली. या कारवाईने बनावट नोटांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. भुसावळात काही दिवसांपूर्वी बनावट नोटा पकडण्यात आल्यानंतर यावलमध्येही कारवाई झाली व आता सावद्यात बनावट नोटा सापडल्याने नागरिकांसह व्यापारीवर्गात भीती पसरली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शेख आरिफ शेख फारूक व अझरखान अयुब खान (दोघे राहणार ख्वाजा नगर, सावदा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून सात हजार सहाशे रुपये दराच्या शंभर रुपये चलनी दराच्या 76 नोटा व दुचाकी मिळून 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शहरात बनावट नोटांसह येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, एएसआय संजय देवरे, हवालदार संजीव चौधरी, हवालदार उमेश पाटील, हवालदार यशवंत तहाकडे, हवालदार किरण पाटील, नाईक निलेश बाविस्कर यांच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !