अपघाताची मालिका कायम : दोन दुचाकींच्या धडकेत एरंडोलच्या शेतकर्‍याचा मृत्यू


Series of accidents continues: Erandol farmer dies in collision between two bikes एरंडोल (24 डिसेंबर 2024) : शहरात अपघाताची मालिका कायम आहे. एक दिवसांपूर्वीच दोघांचा दुचाकी अपघातात मृत्यू ओढवल्यानंतर सोमवार, 23 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान धरणगाव रस्त्यावर बजरंग ट्रेडर्सजवळ दोन दुचाकी धडकल्यानंतर एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
सोमवार, 23 डिसेंबर रोजी धरणगाव ते एरंडोल रस्त्यावर बजरंग ट्रेडर्स दुकानाजवळ एरंडोल येथील शेतकरी लहूदास पोपट महाजन (55, ओम नगर, एरंडोल) हे बजाज कंपनीच्या लाल रंगाच्या सिटी 100 (एम.एच.19 डीई 9721) ने शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर परतत असताना समोरून येणारी दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.6357) वरील अज्ञात चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात महाजन गंभीरपणे जखमी झाले.

त्यांना जळगाव येथे उपचारार्थ नेत असताना पिंपळकोठे गावाजवळ त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात वरील दुचाकीवरील अज्ञात चालाकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार कपिल अशोक पाटील करीत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !