जळगावातील ओंकारेश्वर मंदिर परिसरातून आठ लाखांची इनोव्हा लांबवली


जळगाव (24 डिसेंबर 2024) : सुमारे आठ लाख रुपये किमतीची ईनोव्हा क्रीस्टा या महागड्या वाहनासह चोरट्यांनी पलायन केले. रविवार, 22 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरात ओंकारेश्वर मंदिर परिसरात ही घटना उघडकीस आली.

पोलिसात गुन्हा दाखल
अविनाश कांतीलाल जैन (48, रा.व्यंकटेश कॉलनी, समतानगर रोड, जळगाव) यांनी ईनोव्हा क्रिस्टा (क्रमांक एम.एच.19 सी.जे.0707) हे वाहन शनिवार, 21 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ओंकारेश्वर मंदिराजवळ रस्त्याच्याकडेला लावली होती. या वाहनाला लक्ष्य करत चोरट्यांनी ती चोरुन नेली. सकाळी अविनाश जैन हे येथे आले असता त्यांना वाहन दिसले नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार रविवार, 22 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. गुन्ह्याचा तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !