जळगावातील बालकाला चिरडणार्या डंपर मालकासह चालकाविरोधात गुन्हा
जळगाव (25 डिसेंबर 2024) : मामांसोबत दुचाकीवरून निघालेल्या नऊ वर्षीय बालकाला डंपरने बुधवारी सायंकाळी चिरडल्याची घटना कालिका माता मंदिर चौकात घडली होती. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात डंपरच्या चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण ?
चेतन हरी बेंडाळे (31, रा.भादली, ता.जळगाव) हे बुधवारी संध्याकाळी भाचा योजस आणि भाची भक्ती यांना घेऊन सायंकाळी सात वाजता दुकानात चायनीज पदार्थ खाण्यासाठी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.वाय.3593) निघाल्यानंतर भुसावळकडून भरधाव वेगाने आलेल्या व नंबर प्लेट नसलेल्या डंपरने चेतन बेंडाळे यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने योजसचा मृत्यू ओढवला तर भाची भक्ती व बेंडाळे हे जखमी झाले होते.

अपघातानंतर जमावाने डंपर पेटवला
शहरात सुरू असलेल्या अपघाताच्या मालिकेनंतर संतप्त जमावाने डंपर पेटवला होता शिवाय अग्निशमन दलाचे वाहन आल्यानंतरही डंपरला लागलेली आग विझवू देण्यास मनाई केलीहोती. अपघाताबाबत मदत करण्याविषयी फिर्यादीने डंपर चालकाला विनवणी करूनही त्याने मदत न करता पळ काढला होता. याप्रकरणी डंपर चालक शुभम भोलाणे (रा.वांजोळा, ता.भुसावळ) व डंपर मालक आकाश बोरसे (रा.कांचन नगर, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


