सायबर गुन्हेगारांनी लुटलेली रक्कम जळगाव सायबर सेलने गोठवली : तक्रारदारांना एक कोटींची रक्कम परत


Jalgaon Cyber ​​Cell freezes money looted by cyber criminals : Rs 1 crore returned to complainants जळगाव (28 डिसेंबर 2024) : जळगाव सायबर सेलच्या पथकाने तीन महिन्यात दोन गुन्ह्यात 70 लाख तर इतर गुन्हे मिळून 40 लाख असा ऐकून एक कोटी 11 लाख 42 हजार 932 रुपयांची रोकड परत मिळवून देण्यात यश मिळवले. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

शेअर मार्केटच्या नावे एक कोटीचां चुना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतकुमार कृपाराम उईके यांना 18 जुलै ते दि.26 सप्टेंबर 2024 पावेतो अंकित अग्रवाल, मिरा यांनी संपर्क करुन शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुक करिता वेगवेगळया व्हॉटप ग्रुपमध्ये अ‍ॅड करुन केले. लॅनकीट नावाचे अ‍ॅप्लीकेशन त्यांना डाऊनलोड करण्यास सांगुन फिर्यादीकडुन शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरवातीला फिर्यादी यांना भरलेल्या रक्कमेवर 3500 रुपये नफा झाल्याचे सांगून त्यांच्याकडुन एकूण 1 कोटी 6 लाख 6 हजार 985 रुपये ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे घेवुन त्यांना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती.

संतकुमार कृपाराम उईके यांनी घटनेबाबत दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायबर पो.स्टे येथे गुरन 59/2024 इछड 318 (4), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (ऊ) प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पथकाने फिर्यादी यांनी ज्या वेगवेळ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते त्यापैकी, युको बँक गुजरात व आंध्रप्रदेश येथील बँक खाते तात्काळ गोठवण्यात आले. त्यामधील एकूण 52 लाख 47 हजार रुपये हे पैसे न्यायालयामार्फत आदेशीत करुन फिर्यादीच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येवुन फिर्यादीस परत मिळवुन दिली आहे.

डिजीटल अरेस्ट करून लुबाडले 18 लाख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गुलाबराव गरुड यांना दिनांक 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 दरम्यान राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीपराव यांनी संपर्क करुन फिर्यादी यांना मनी लॉडरिंगमध्ये तुमचे सिमकार्ड, पॅनकार्ड व आधाकार्ड चा वापर झाल्याने तुमच्या विरुध्द मुंबई क्राईम ब्रांन्च येथे गुन्हा नोंद झालेबाबत भासवले. राजेंद्र गुलाबराव गरुड यांना डिजीटल अरेस्ट करुन वारंवार धमकी देवुन खोटी कोर्टाची ऑर्डर व ईतर खोटे कागदपत्रे त्यांच्या व्हाटसअप क्रमांकावर पाठविले. त्यांच्याकडुन 18 लाख रुपये रक्कम स्वीकारुन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

घटनेबाबत दिनांक 7 डिसेंबर रोजी सायबर पो.स्टे येथे गुरन 74/2024 इछड 318(4), 336(2), 336(3), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 66 (डी) प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने फिर्यादी यांनी इंडसइंड बँक खात्यामध्ये पैसे भरले होते त्या बँक खात्याची माहीती काढुन बँक खाते जालंदर पंजाब येथील असल्याची माहीती प्राप्त झाल्याने खात्यात असलेली 17 लाखांची रक्कम तात्काळ गोठवली होती. संपूर्ण रक्कम न्यायालयाच्या मार्फत फिर्यादीस परत करण्यात आली आहे.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे, हेमंत महाडीक, सचिन सोनवणे अशांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !