जळगावातील तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
Three criminals from Jalgaon deported for two years जळगाव (31 डिसेंबर 2024) : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या जळगावातील तीन गुन्हेगारांना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी हद्दपार केले आहे. आकाश ऊर्फ खंड्या ठाकूर (23), पवन ऊर्फ बद्या बाविस्कर (23) व आकाश ऊर्फ आक्या ब्रो मराठे (22, सर्व रा.तुकारामवाडी, जळगाव) अशी दोन वर्षांसाठी हद्दपार झालेल्या गुन्हेगारांची नोव आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी : वर्तणुकीत झाली नाही सुधारणा
गुन्हेगारांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. तुकारामवाडी परिसरातील आकाश ठाकूर याच्याविरोधात सात, पवन बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश मराठेविरुद्ध खुनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला होता.
एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश घुगे यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेत त्यांची जिल्ह्याबाहेर रवानगी केली. या कारवाईने जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


