मानराज शोरूमला भीषण आग : जळगावातील घटनेत लाखोंचे नुकसान


Massive fire breaks out at Manraj showroom : Losses worth lakhs in Jalgaon incident जळगाव (8 जानेवारी 2025) : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील जळगाव रस्त्यावरील मानराज मोटर्स शोरूमला बुधवारी सकाळी 7 वाजता अचाकन लाग लागली असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या 15 बंबांच्या फेर्‍या पूर्ण होवूनही अद्याप आगीवर नियंत्रण मिळालेले नाही.

आगीमुळे उडाली खळबळ
जळगावच्या एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर्स शोरूमला बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शोरूमच्या दुसर्‍या माळ्यावर असलेल्या साहित्य ठेवलेल्या गोदामाला अचानक आग लागली. बंदिस्त जागेमुळे आग वेगाने पसरली. खिडक्यांमधून बाहेर येणार्‍या आगीच्या लोळांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.


या आगीत शोरूममधील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अविरत प्रयत्न करत आहेत. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आगीमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत घटनास्थळ सील केले आहे. एमआयडीसी पोलिस आणि संबंधित यंत्रणा आग लागण्यामागील कारणाचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !