वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून भुसावळात जनजागृती

वाहनधारकांचे प्रबोधन तर मोकाट जनावरांना लावले रिफ्लेक्टर बेल्ट


भुसावळ (14 जानेवारी 2025) : रस्ते अपघातात वाढलेले मृत्यूचे प्रमाण पाहता अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस प्रशासनातर्फे वाहनधारकांवर कठोर कारवाईसह त्यांच्यात नियमांबाबत जनजागृती केली जात आहे शिवाय प्रबोधनही केले जात आहे. शहरात मंगळवार, 14 रोजी दुपारी पाळधी महामार्ग पोलीस केंद्र व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नशिराबाद (तरसोद भाग) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षीत वाहतूक सप्ताहानिमित्त शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालय परिसरात मोकाट जनावरांना रिफ्लेक्टर बेल्ट लावण्यात आले तसेच वाहन चालक यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 बाबत माहिती देण्यात आली.

सुरक्षीत प्रवासाबद्दल जनजागृती
पाळधी महामार्ग पोलीस प्रशासनातर्फे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद वली सैय्यद यांनी महामार्गावरून प्रवास करताना घ्यावयाची खबरदारी तसेच महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक नियमन तसेच दारू पिऊन वाहन न चालवणे, घाट मार्गावर तसेच जोड रस्त्याच्या ठिकाणी वाहनाचा वेग कमी ठेवणे, महामार्गावरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे, लहान मुलांच्या हातात वाहन न देण्यासह धावत्या वाहनावर मोबाईल न उचलणे व वापरण्याबाबत जनजागृती करून प्रबोधन करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !