जळगावात टीयर गॅसमुळे नागरिकांच्या डोळ्यातून वाहिल्या जलधारा


Tear gas in Jalgaon causes tears to flow from citizens’ eyes जळगाव (10 एप्रिल 2025) : जळगाव पोलीस दलाने 14 एप्रिलच्या अनुषंगाने पोलिस कवायत मैदानावर बुधवार, 9 रोजी सायंकाळी अश्रूधुरांचे नळकांडे फोडण्याचे मॉकड्रील घेतले मात्र हवेचा अंदाज न घेतल्यामुळे चार नळकांडातून निघालेला धूर हवेत पसरून 800 मीटर परिघात नागरीकांच्या नाक, डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या.

वाहनधारकांनाही प्रचंड मनस्ताप
पोलिस कवायत मैदानावर फोडलेल्या अश्रूधुराच्या नळकांड्यामुळे वाहनधारकांनाही त्रास सोसावा लागला. हवेचा वेग अन दिशा न पाहताच अश्वधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याने काल सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत वाहनधारकांसह जळगावकरांना त्रास जाणवला. स्टेडीयम कॉम्प्लेक्समध्ये दुकानदारांनी दुकानेही या प्रकारानंतर बंद केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !