भुसावळ रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरतात तेव्हा…!
लोहमार्ग पोलिसांची रंगीत तालीम : दंगा काबूचे कर्मचार्यांना प्रात्यक्षिक
When terrorists enter Bhusawal railway station…! भुसावळ (29 एप्रिल 2025) : पहलगाममध्ये झालेल्या भीषण आतंकवादी हल्ल्यानंतर देशभरातील रेल्वे स्थानकांनाही अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने गाड्यांसह रेल्वे स्थानकावर गस्त वाढवली आहे. रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरल्यास वा जातीय दंगल उफाळून आल्यास त्या परिस्थितीत कसे तोंड द्यावे यासाठी लोहमार्ग पोलिसांसाठी मंगळवारी रंगीम तालीम घेण्यात आली.
सतर्कतेत यंत्रणा पास
तोंडाला मास्क बांधलेले दोन संशयीत रेल्वे स्थानकात शिरल्याचा मेसेज येताच लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाची यंत्रणा अत्याधूनिक शस्त्रांसह दाखल झाली. काही वेळेत दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या जागेवर घेराबंदी करून डमी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले मात्र कर्मचार्यांच्या सतर्कतेसाठी घेण्यात आलेले प्रात्यक्षिक पाहून रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना काही वेळेसाठी धडकी भरली मात्र नंतर हे सुरक्षेसाठी असलेले मॉक ड्रील असल्याचे कळताच प्रवाशांच्या जीवात जीव आला.


यांचा रंगीत तालीममध्ये सहभाग
लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, सहाय्यक निरीक्षक किसन राख, पोलीस उपनिरीक्षक निकाळजे, गोपनीय विभागाचे एएसआय प्रदीप शेजवळकर, लोहमार्गचे 22 अंमलदार तसेच आरपीएफचा एक अधिकारी व आठ कर्मचारी, नगरपालिका अग्निशमन दल तसेच क्यूआरटी जळगावचे 13 अंमलदार व आरसीपीचे 12 कर्मचारी सहभागी झाले.





