ग्रामगौरवचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांचा ‘गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मान’

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत संपन्न झाला सोहळा


Vivek Thackeray, the founding editor of Gram Gaurav, was honored with the ‘Gaganbharari Samarth Award’ जळगाव (11 मे 2025) :ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांना पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘गगनभरारी सन्मान -2025’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे बुक फेस्टिवलचे संयोजक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे हे होते.

ज्येष्ठ संपादक व पत्रकार विद्याधर ताठे, उद्योजक दीपक मोकाशी आणि सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कुलकर्णी यांच्याहस्ते अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये कर्तुत्ववान म्हणून आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या विविध 20 जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वी साखर कारखानदार भाऊसाहेब आव्हाळे, प्रशासनातून सेवानिवृत्त झालेले लालासाहेब जाधव,डॉ.योगेश देशमुख,गिरीश खेर, सनदी लेखापाल शंकर अंदानी, रत्नप्रभा बेल्हेकर, हिंदुराव पवार, रजनी घोरपडे, डॉ.अनिल धनगर, योगीता सपकाळ आदींचा यामध्ये समावेश होता. अवघ्या दोन वर्षात विविध प्रकारचे सुमारे 200 पुस्तके प्रकाशित करणार्‍या समर्थ फाउंडेशनचे किरण इनामदार आणि वल्लरी मीडियाचे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सर्व पुरस्कारार्थीच्या दैदीप्यमान प्रवासाची संघर्षगाथा उलगळणारे ’गगनभरारी’ हे पुस्तक सुद्धा यावेळी प्रकाशित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वल्लरी मीडियाचे संपादक व्यंकटेश कल्याणकर यांनी केले. ज्योती इनामदार, श्रद्धा जगदाळे, डॉ.रवी आचार्य, गणेश चप्पलवार, जगन्नाथ कुलकर्णी, सचिन गोंगटल्लू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शब्द जादूगर सुनील धनगर व प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन तर मानसी चिटणीस यांनी आभार मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !