कोळन्हावी-पुनगाव फाट्यावर मस्करीतून वाद : एकास मारहाण


यावल (16 जून 2025) : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावात पुनगाव जाणार्‍या फाट्यावर मस्करीतून बेटा बोलण्याच्या संशयावरून एका 48 वर्षीय इसमास एकाने शिवीगाळ करून मारहाण केली व काठीने डोक्याला, हाताला मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोळन्हावी, ता.यावल या गावाजवळील पुनगाव फाट्यावर मस्करीतून बेटा बोलण्याच्या संशयावरून रवींद्र मदन सोनवणे (48) यांना नंदलाल एकनाथ सोळंके (रा.कोळन्हावी) याने त्यांना शिवीगाळ करून काठीने त्यांच्या डोक्यावर, हातावर व कमरेवर मारून दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !