अ‍ॅपे रिक्षाचा भीषण अपघात : महिला गंभीर जखमी


Appy rickshaw accident : Two women killed on the spot जळगाव (12 जुलै 2025) :  अ‍ॅपे रिक्षा व टाटा मॅजिकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसर्‍या महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर अनेक मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवार, 12 रोजी सकाळी जळोद-अमळगाव रस्त्यावर घडला. दरम्यान, या अपघातात कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली व अपघातात मृत्यू झाल्याच्या वृत्ताचे खंडण केले.

काय घडले नेमके
मजूर घेऊन जाणारी एक अ‍ॅपे रिक्षा (एम.एच.19 बी.जे.4365) अमळगावहून जळोदच्या दिशेने जात असताना समोरून भरधाव वेगात येणार्‍या टाटा मॅजिक (एम.एच.19 सी.झेड. 2522) वाहनाने अ‍ॅपेला जोरदार धडक दिली.






अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने अमळनेर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातात दोन महिला जखमी असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे तर दुसर्‍या महिलेचा पाय फ्रॅक्चर आहे. जखमी मजूरांवर तातडीने उपचार सुरू आहेत. काही मजुरांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याची माहिती आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !