भुसावळात श्री नाना महाराज तराणेकर यांचा 128 वा जन्मोत्सव सोहळा


128th birth anniversary celebration of Shri Nana Maharaj Taranekar in Bhusawal भुसावळ (3 ऑगस्ट 2025) : अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे प. पू. सद्गुरू श्री.नाना महाराज तराणेकर यांचा 128 वा जन्मोत्सव सोहळा श्रीराम नगरातील श्रीराम मंदिरात साजरा झाला. सकाळी भक्तीगीत, भजन गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करून, पादुकांचे पाद्यपूजन, पारायण, आरती, महाप्रसाद, संध्याकाळी करुणा त्रिपदी व सुंदरकांड आस्था परिवार, भुसावळ आयोजित सुंदरकांड अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती
सामाजिक व अध्यात्मिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले राधाकृष्ण प्रभातफेरीचे संस्थापक राधेश्याम बिरदीचंदजी लाहोटी यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्रिपदी परिवारातर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.


यशस्वीतेसाठी सरिता देशपांडे, विलास पवार, महेश पाटील, रवींद्र जोशी, सुधीर देशपांडे आदींचे सहकार्य लाभले. कृपागौरी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !