पालघर हत्याकांड प्रकरणी दोघा पोलिसांचे निलंबन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


शंभर आरोपींना पकडण्यात यश : सोशल मिडीयावर अफवा पसरवणार्‍यांची गय नाहीच -मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : पालघर नजीकच्या 110 किमी अंतरावर असलेल्या केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीनजीक घडलेल्या हत्याकांड प्रकरणी दोघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून ज्या गावात ही घटना घडली हा दुर्गम भाग असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. मॉब लिचिंग प्रकार अन्य राज्यात अथवा गेल्या पाच वर्षात राज्यातही घडले आहेत. हे घडायला नको ही आपली संस्कृती नाही, मला राजकारण करायचं नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शंभरापेक्षा अधिक आरोपी तुरूंगात
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे बंद करण्याचं आवाहन केलं होतं त्या दिवशी ही घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगत तेव्हा रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे पाचपर्यंत पालघरच्या पोलिस अधीक्षक आणि पोलिसांनी जंगलात फिरून 100 पेक्षा जास्त आरोपींना पकडलं होतं. हे आरोपी तुरुंगात आहेत. त्यांना 18 तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर 30 तारखेपर्यंत त्यांना कस्टडीत ठेवलं आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका, या घटनेतील कोणत्याही दोषींना सोडणार नाही. सीआयडी गुन्हे शाखेचे डीआयजी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुढील तपास होईल. या घटनेतील जबाबदार सगळेच तुरुंगात आहेत. जे फरार आहेत त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. हिंदू-मुस्लीम नजरेने या घटनेकडे पाहू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. सोशल मीडियावर जो कुणी आग भडकवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांचा शोध लावला जाईल, त्यांच्यावरही कठोर शासन केले जाईल, असं इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !