पुणे-जम्मू तवी-पुणे झेलम एक्स्प्रेसची एक फेरी रद्द


One round of Pune-Jammu Tawi-Pune Jhelum Express cancelled भुसावळ (1 सप्टेंबर 2025)  : जम्मू विभागातील झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर परिणाम झाला आहे. त्यानुसार उत्तर रेल्वेच्या कठुआ-माधोपुर पंजाब रेल्वे स्थानकांदरम्यान वाहतूक निलंबित झाल्यामुळे खालील गाड्या रद्द करण्यात आली आहे.

शनिवार, 30 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 1077 पुणे-जम्मू तवी झेलम एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.


रविवार, 31 रोजी जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 11078 जम्मू तवी-पुणे झेलम एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वरील बदल लक्षात घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !