भुसावळात विश्वज्योती गणेश मंडळाने साकारली श्री विठ्ठल आरास

महिला-मुलींच्या प्रबोधनावर भर ; विद्यार्थ्यांसाठी होणार स्पर्धा


Vishwajyoti Ganesh Mandal creates Shri Vitthal Aaras in Bhusawal भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरातील श्रीराम मंदिराजवळील विश्वज्योती गणेश मंडळ, मारवाडी गल्लीचा राजा या मंडळाने यंदा 57 व्या वर्षात पदार्पण केले. प्रत्येक वर्षी वेगळ्या संकल्पनेवर भव्य आरास उभारणार्‍या या मंडळाने यंदा विठ्ठल मूर्तीची प्रतिकृती व वारकरी संप्रदायाची आरास साकारली आहे. मंडपाचा आकार 20 बाय 30 फूट असून तेथे 1 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणारा दीपोत्सव भाविकांचे आकर्षण ठरणार आहे..

सामाजिक भान जपणारे उपक्रम
मंडळातर्फे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक भान जपणारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. भुसावळ येथील विश्वज्योती गणेश मंडळाने महिला, मुलींना योग्य पद्धतीने ओढणी बांधण्याचे धडे दिले. मंडळातर्फे दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यात शनिवारी नम्रता सोनी आणि रेणू पांडे यांनी महिला-मुलींनी योग्य पद्धतीने ओढणी कशी बांधावी? याचे प्रशिक्षण दिले.


प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे उपस्थित होत्या. विश्वज्योती गणेश मंडळ मारवाडी गल्लीचा राजा या मंडळातील कल्पेश नाहाटा, हितेश अग्रवाल, भारती वैष्णव, अक्षय वर्मा, पवन दरगड व आशिष अग्रवाल व पदाधिकार्‍यांनी गेल्या 15 दिवसांपासून आरास उभारणीसाठी परिश्रम घेतले.

योग्य ओढणी कशी बांधावी याचे धडे लहान मुलांसाठी खेळ, महिलांसाठी विविध स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा व समाजाला एकत्र आणणारे उपक्रम राबवण्यात येत आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजहिताचे व्यासपीठ ठरावे या उद्देशाने मंडळाचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी सक्रिय आहेत, असे कल्पेश नाहाटा यांनी सांगितले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !