भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात स्वच्छता सेवा अभियान


Cleanliness campaign at De.N.A. Bhole College, Bhusawal भुसावळ (17 सप्टेंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकताच स्वच्छता ही सेवा अभियान 2025 या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या विभागाने दिलेल्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे


या अभियानाचा भाग म्हणून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 17 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छतोत्सव हा उपक्रम राबवण्यात आला. स्वच्छतोत्सव कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता केली.

प्रसंगी झालेल्या अनौपचारिक चर्चेत प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनिल सावळे, महिला अधिकारी प्रा.श्रेया चौधरी, माजी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वच्छता मोहिमत सहभागी झाल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !