चोपडा बसस्थानकावर वाडा-यावल बसमधून वाहकाने विद्यार्थ्यांना खाली उतरवत केली शिवीगाळ : यावल आगारात तक्रार
The conductor abused the students while getting off the Wada-Yaval bus at Chopra bus stand: Complaint filed at Yaval depot यावल (19 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील किनगावसह परिसरातील मोठ्या संख्येत विद्यार्थी हे चोपडा येथे शिक्षणासाठी जातात. किनगाव बस स्थानकावरून तसेच चोपडा बस स्थानकावरून येण्या जाण्याकरिता या पास धारक विद्यार्थ्यांना वाडा यावल या बसचे वाहकाने बसमध्ये बसू दिले नाही तर मंगळवारी देखील या विद्यार्थ्यांना चोपडा बसस्थानकावरून बस वाहकाने बसमध्ये बसवले नाही तसेच त्यांच्यासोबत उर्मट आणि उद्धट पद्धतीने बोलून विद्यार्थ्यांना बसच्या खाली उतरून दिले आणि शिविगाळ केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याबाबतचे तक्रारी निवेदन यावल आगाराकडे बुधवारी देण्यात आले आहे. दरम्यान आगार व्यवस्थापकांनी वाडा एस.टी.आगाराकडे ही तक्रार पाठवली आहे.
काय घडले विद्यार्थ्यांसोबत ?
किनगाव ता. यावल हे गाव तालुक्यातील पश्चिम भागात पंचकोशीतील प्रमुख ठिकाण आहे. येथून परिसरातील विद्यार्थी एकत्र येऊन चोपडा येथे मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी जात असतात. या सर्व विद्यार्थ्यांकडे पास आहे.

एस.टी.ची पास असतानादेखील या विद्यार्थ्यांना वाडा यावल एस.टी. बस (क्रमांक एम. एच. 14 बी. एच. 3703) वरील वाहक विद्यार्थ्यांना बस मध्ये प्रवासा करीत घेत नाही. दरम्यान 16 सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी विद्यार्थी चोपडा बस स्थानकात होते. या बसमधील वाहकाने विद्यार्थ्यांना अर्वाच्य भाषेचा वापर करून त्यांना बस च्या खाली उतरून दिले आणि शिवीगाळ केली व पास असलेल्या विद्यार्थ्यांना गाडीत बसू देणार नाही असे सांगून त्याने तेथे विद्यार्थ्यांना खाली उतरवून दिले.
दरम्यान, एस.टी.आगाराची पास असताना देखील अशा पद्धतीची वाहकाची वागणूक ही अत्यंत संताप जनक असून पालकांनी यावल येथील एसटी आगारात येऊन बुधवारी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनावर भगवान धनगर, रवींद्र महाजन, नितीन चौधरी, हर्षल पाटील, जुबेर तडवी सह मोठ्या संख्येत पालकांच्या स्वाक्षर्या आहेत. दरम्यान सदर एसटी बस ही यावल आगाराची नसून वाडा एसटी आगाराची आहे. येथे प्राप्त झालेली तक्रार व विद्यार्थ्यांसोबत वाहकाच्या अशा या वागणुकीची तक्रार आपण इथे स्वीकारून ती वाडा एसटी आगाराकडे पाठवून विद्यार्थ्यांना या बस मध्ये घेण्यात यावे व विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये, असे संबंधित आगाराला कळवणार असल्याचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी सांगितले.




