पथ विक्रेत्यांसाठी प्रधानमंत्री स्व.निधी कर्ज योजना तातडीने सुरू करा : मंत्री रक्षा खडसेंना साकडे


Immediately launch the Prime Minister’s Self-funded Loan Scheme for street vendors : Minister Raksha Khadse urged भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : पथ विक्रेते, फेरीवाले व हातगाडीधारकांना व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लावणारी केंद्र शासनाची प्रधानमंत्री स्व.निधी कर्ज योजना ही काही कारणास्तव बंद झाली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी पथविक्रेत्यांनी मागणी केली आहे. भुसावळ पालिकेच्या पथविक्रेता समितीतर्फे क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

तर विक्रेत्यांना मोठा दिलासा
या योजनेमुळे शहरातील गोरगरीब फेरीवाले व हातगाडी धारकांना कर्ज सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यास मोठी मदत झाली मात्र योजना बंद झाल्याने अनेक पथ विक्रेते अडचणीत सापडले असून योजना पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली.






निवेदनावर पालिकेच्या पथविक्रेता समितीचे पदाधिकारी राजू सपकाळे, गोपाल पुरोहित, साजीद बागवान, सागर ठाकूर व उज्ज्वला राजपूत आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !