नवरात्रोत्सवात भाविकांना दिलासा : मैहर स्थानकावर 11 एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरता थांबा
भुसावळ (21 सप्टेंबर 2025) : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील मैहर येथे होणार्या प्रसिद्ध मॉ शारदा नवरात्र मेळा दरम्यान भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी 22 सप्टेंबर 2025 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत भुसावळ विभागातून धावणार्या 11 जोड्या एक्सप्रेस गाड्यांना मैहर स्थानकावर 5 मिनिटांचा तात्पुरता थांबा (हॉल्ट) देण्यात आला आहे.
या गाड्यांना मिळाला थांबा
या कालावधीत मैहर स्थानकावर थांबा घेणार्या गाड्यांमध्ये 11055/ 11056 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11059/ 11060 लोकमान्य टिळक टर्मिनस छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 19051/ 19052 वलसाड – मुजफ्फरपूर – वलसाड एक्सप्रेस, 15268/ 15267 लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11037/ 11038 पुणे – गोरखपूर – पुणे एक्सप्रेस,22103/ 22104 लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कँट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 18610/ 18609 लोकमान्य टिळक टर्मिनस -रांची -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 22971/ 22972 बांद्रा टर्मिनस – पटणा – बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस, 22131/ 22132 पुणे – बनारस – पुणे एक्सप्रेस, 15647/ 15648 लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 19045/ 19046 सूरत – छपरा-सुरत एक्सप्रेस या गाड्यांना पाच मिनिटांचा येतांना जातांना थांबा दिला आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या विशेष थांब्यांचा लाभ घ्यावा. या निर्णयामुळे नवरात्र मेळ्यात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणार्या भाविकांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.




