भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात हिंदी सप्ताह
Hindi Week at Shri Sant Gadge Baba Hindi College, Bhusawal भुसावळ (21 सप्टेंबर 2025) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी, सांस्कृतिक विभागाच्या प्रा. अनुपम शर्मा, प्रा. ज्योती ओस्तवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
विविध स्पर्धांचे आयोजन
हिंदी सप्ताहाच्या अंतर्गत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, पत्रलेखन, घोषवाक्य व पोस्टर्स स्पर्धा, शोधनिबंध (हिंदी मे रोजगार ) तसेच (हिंदी भाषा एवं चुनौतीया) यावर वक्तृत्व स्पर्धा व गद्य, कविता वाचन या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्पर्धेत दीक्षा मोरे, गौरव सोनवणे, राहत शेख, मीना शेख, दिपाली गुळेकर यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. तसेच बी.कॉम व बीएच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सर्व स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.
विज्ञान युगात हिंदीला महत्व
हिंदी दिवसाचे औचित्य साधून डॉ. पुनम त्रिवेदी यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्या म्हणाल्या की, ‘विश्व मे हिंदी के बढते चरण’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले व हिंदी भाषेला जगभरात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. विज्ञान युगात हिंदी भाषेला फार महत्त्व आहे असेही सांगितले.
दैनंदिन जीवनात हिंदीचा करावा वापर
प्राचार्य डॉ.रमेश जोशी म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.ज्योती ओस्तवाल तर आभार प्रा.अनुपम शर्मा यांनी मानले.
यशस्वीतेसाठी डॉ सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, शीबा खान, समता तायडे आदी सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.




