भुसावळात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे महाराजा अग्रसेन जयंती उत्साहात


Maharaja Agrasen Jayanti celebrated in Bhusawal by Shri Radhakrishna Prabhat Ferry भुसावळ (22 सप्टेंबर 2025) : महाराजा अग्रसेन जयंती श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज परिसरातील श्री अग्रसेन चौकात छत्रपती श्री अग्रसेनजी महाराज यांची जयंती श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे पहाटे सहा वाजता अग्रसेन चौकात पुष्पहार व पूजा करून उत्साहात साजरी करण्यात आली.

यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी महाराजांनी समाजासाठी केलेल्या महान कार्याची माहीती उपस्थितांना सांगितली. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती ब्रिजमोहन अग्रवाल, देवेंद्र बन्सल, राजेश बन्सल, राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, अ‍ॅड.गोकुळ अग्रवाल, गोपाल तिवारी, जी.आर.ठाकूर, अर्जुन पटेल, प्रेमराज लढ्ढा, लिलाधर अग्रवाल, गोपाल जांगीळ, राजेश अग्रवाल, संजय चांडक, श्याम दरगड, डॉ.शुभांगी राठी, वीणा लाहोटी, राधा हेडा, शीतल भराडिया, शशी लाहोटी, अयोध्यादेवी मंत्री, संगीता सुनील अग्रवाल यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जे.आर.शर्मा तर आभार जे.बी.कोटेचा यांनी मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !