नमो युवा रनमध्ये धावले भुसावळकर !

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजन : चार गटात स्पर्धा


Bhusawalkar ran in the Namo Yuva Run! भुसावळ (22 सप्टेंबर 2025) : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नशा मुक्त भारतासाठी ‘मॅरेथॉन 2025 नमो युवा रन’ चे आयोजन रविवार, 21 रोजी करण्यात आले. स्पर्धेसाठी चार गट करण्यात आले होते खुला पुरुषांचा गट, खुला महिलांचा गट, शालेय मुलांचा गट व शालेय मुलींचा गट अशा चार गटांमध्ये युवा व युतींनी हजारोच्या संख्येने सहभाग नोंदवला.

असा होता स्पर्धेचा मार्ग
नमो युवा रन स्पर्धेचा मार्ग रेल्वे ग्राउंड भुसावळ ते हंबर्डीकर चौक, लोखंडी पुलाखालून शिवाजी कॉम्प्लेक्स, पांडुरंग टॉकीज समोरून मोटु शोबराज चौकापर्यंत व तिथून त्याच मार्गाने परत रेल्वे मैदानावरती असा तीन किलोमीटरचा हा युवा नमो रन आयोजित करण्यात आला होता.


यांची होती उपस्थिती
नमो रनचे उद्घाटन क्रीडा ज्योत पेटवून , बलून सोडून केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. भुसावळ रेल्वेचे एडीआरएम सुनील कुमार सुमन, आर.के.मीना, डीएससी चित्रेश जोशी, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ.केतकी पाटील, परीक्षीत बर्‍हाटे, किरण कोलते, संदीप सुरवाडे, गिरीश महाजन, अमोल महाजन, जयंत माहूरगड, प्रशांत पाटील, आनंद ठाकरे, गोलू पाटील, पवन बुंदीले, प्रमोद नेमाडे, अनिल वारके, पवन बुंदीले, अनिरुद्ध कुलकर्णी, जयंत माहूरकर, निखील वायकोळे, गिरीश महाजन, विनीत हंबर्डीकर, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, संकल्प वाणी, खुशाल जोशी, प्रवीण कर, प्रशांत पाटील, प्रशांत नरवाडे, तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात, क्रीडा व शालेय शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, रमण भोळे उपस्थित होते.

असा आहे स्पर्धेच निकाल

पुरुषांच्या खुल्या गटांमध्ये प्रथम- प्रतीक सोनवणे, द्वितीय- आदित्य जाधव, तृतीय- लकी खरारे आला.

महिलांच्या गटामध्ये प्रथम- रेणुका धनगर, द्वितीय- गायत्री माळी, तृतीय- अश्विनी रोझोदे

शालेय गटामध्ये मुलांमध्ये प्रथम- निलेश इंगळे, द्वितीय रोहित बावणे, तृतीय योगेश शिरसाळे

शालेय गटातील मुलींमधून प्रथम- पूर्वा बाविस्कर, द्वितीय- हर्षाली वाणी, तृतीय- राखी महाजन

यांचे स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम
स्पर्धाधिकारी म्हणून डॉ.प्रदीप साखरे, विलास पाटील, मनोज वारके, मेघश्याम शिंदे, मुकेश मोरे, रवींद्र चोपडे, निकम, गोपी सिंग, ममता जहांगीड, डॅनियल पवार, दत्तू अहिरे, विजय संकेत, अलीस्टर , चेतन जैन आदींनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी परीक्षित बर्‍हाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, डॉ.प्रदीप साखरे यांच्यासह क्रीडा शिक्षक महासंघाचे पदाधिकारी, तालुका अ‍ॅथलेटिक्स असो., व रेल्वेच्या पदाधिकारी यांनी तसेच गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने प्रयत्न केले. सूत्रसंचालन रमण भोळे व डॉ.प्रदीप साखरे यांनी केले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !