भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा


National Service Scheme Day celebrated at P.K. Kotecha Mahila College, Bhusawal भुसावळ (24 सप्टेंबर 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आाल. सर्वप्रथम पूज्य साने गुरुजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जीवन धांडे, प्रमुख पाहुणे डॉ.शिल्पा पाटील व एनएसएस अधिकारी यांनी केले. प्रास्ताविक एनएनएस अधिकारी डॉ.मीना चौधरी यांनी केले.

तर मनुष्य जीवन सार्थक
विद्यार्थी, त्यांची सामाजिक बांधिलकी व एनएसएसचे योगदान या विषयावर डॉ.शिल्पा पाटील म्हणाल्या की, एनएसएस आपल्यातील षडरिपू नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका अदा करतो व मनुष्य जीवन सफल व सार्थक बनवते.


राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक धनश्री भोई व डिंपल निकम या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आलेले अनुभव व राष्ट्रीय सेवा योजना देश सेवा म्हणून जोपासावी, असे आम्हाला वाटते, असे सांगितले.

प्रभारी प्राचार्य डॉ.जीवन धांडे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना हा मनुष्याला मनुष्याची जोडण्याचा एक बंध आहे व त्यामुळे समाज बनतो व प्रगती करतो. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळते त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा व देश सेवेला हातभार लावावा.

सूत्रसंचालन स्नेहल सपकाळे तर आभार वैष्णवी पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.एस.बी.नेतनराव, प्रा.एन.एस.गुरूचळ, उज्वला महाजन, मुक्ती जैन यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !