भुसावळातील द वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘सायन्स क्विझ’ स्पर्धेत यश
Students of The World School in Bhusawal succeed in the ‘Science Quiz’ competition भुसावळ (24 सप्टेंबर 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये नुकतीच सायन्स क्विझ स्पर्धा झाली. या स्पर्धेत भुसावळातील द कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले.
विजेत्या संघात नववीचा विद्यार्थी यश भराडे, कार्तिकेय यादव तसेच दहावीचा दिव्यांश फुलझेले, शांभवी श्रीवास्तव या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक सी.ए.रोहित कोलते , शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट व शिक्षकांनी कौतुक केले. शाळेतील शिक्षक लक्ष्मणसिंग ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.





