हीच बाळासाहेबांची शिकवण ! : भुसावळातील कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांच्याकडून पूरग्रस्त शेतकर्‍याला मदतीचा हात


This is Balasaheb’s teaching!: A helping hand from a staunch Shiv Sainik from Bhusawal, Nama Sharma, to a flood-affected farmer भुसावळ (30 सप्टेंबर 2025) : 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या स्व.बाळासाहेबांच्या शिकवणुकीला जागे राहत भुसावळातील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुरग्रस्त शेतकर्‍याला आर्थिक मदत देत आपल्या दातृत्वाच परिचय दिला.

राज्यात पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदील झाले असून बळीराजावरील संकट दूर व्हावे तसेच सुख- समृद्धी नांदावी यासाठी विधीवत शांती यज्ञ करण्यात आला. भुसावळचे नमा शर्मा यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी भुसावळ तालुक्यातील पुरग्रस्त शेतकरी शांताराम तायडे (रा.आचेगाव) यांना आर्थिक मदत करीत स्तुत्य पायंडा रोवला.






हा छोटोनी कार्यक्रम परशूराम मंदिरात झाला. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी ललित कुमार मुथा, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, शहर प्रमुख गणेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !