द वर्ल्ड स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात
भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना गांधीजींचे विचार सांगून स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.




