यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सन्मान सोहळा
Honor ceremony for senior retired employees at Yaval Integrated Tribal Project Office यावल (6 ऑक्टोबर 2025) : यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम घेत कार्यालयातून निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 45 कर्मचार्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट कामाची दखल
आदिवासी विकास विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी संघटना यावल प्रकल्प यांच्या वतीने ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह पत्नीक सन्मान सोहळा यावलला झाला. या सन्मान सोहळ्यात 45 ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचार्यांना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याहस्ते शाल व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी अत्यंत दुर्गम भागात कठीण अडचणीच्या वेळी केलेल्या उत्कृष्ट कामाचा गुणगौरव करून त्यांचे पुढील आयुष्य निरोगी राहावे यासाठी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा त्यांनी अध्यक्षीय भाषणात दिल्या. त्यांच्या सहकार्याने सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सभासदांना शासकीय ओळखपत्र सुद्धा प्रदान करण्यात आले.

प्रास्ताविक सेवानिवृत्त संघटनेचे प्रकल्प अध्यक्ष ए.डी.माळी. यांनी केले. संघटनेच्या उपस्थित सभासदांचे स्वागत व शुभेच्छा देताना ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा अनुभव घटक असून दिवसेंदिवस ज्येष्ठांचे महत्त्व त्यांच्या देशासाठी, समाजासाठी योगदान लक्षात घेता शासनाने विविध जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या सवलती, शासन निर्णयानुसार शासकीय ओळखपत्राचे महत्त्व व सेवानिवृत्त संघटनेचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
आर.सी.भालेराव यांनी त्यांच्या मनोगतात संघटनेचे प्रगतीची वाटचाल सांगितली. संघटनेचे राज्याध्यक्ष डी.पी.भरसट यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. डी.डी.पाटील, एस.टी.राठोड, ए.एच.तडवी कार्यकारिणी सदस्य यांनी सेवा कालावधीत तील अनुभव कथन केले.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वी करण्याकरिता पी.पी.धांडे, विजय पाटील, शांताराम चावरे व सर्व कार्यकारी सदस्यांनी परिश्रम घेतले. संघटनेचे उपाध्यक्ष एन.एन.पाटील, ए.बी.कोंगे, सचिव डी.व्ही.चौधरी, एस.एच.चौधरी, पी.आर.महाले, फकीरा तडवी, जामसिंग बारेला, कुमुद नेहेते, साधना पाटील हे कार्यकारी सदस्य व प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते. आभार धनगर यांनी मानले.




