नाथाभाऊंचा खळबळजनक दावा ! चोरट्यांनी सीडीसह पेन ड्राईव्ह व महत्त्वाची कागदपत्रे लांबवली !


Nathabhau’s sensational claim! Thieves stole CDs, pen drives and important documents! जळगाव (29 ऑक्टोबर 2025) : विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील मुक्ताई बंगल्यातून चोरट्यांनी रोकडसह दागिने लांबवले होते मात्र आता स्वतः नाथाभाऊंनी बंगल्यातून केवळ ऐवजच नव्हे तर काही भेटवस्तू, 20 सीडींपैकी 13 सीडी, पेन ड्राईव्ह आणि काही महत्त्वाची कागदपत्रे लांबवल्याचा दावा केला आहे. शिवाय ही चोरी करवून आणण्यामागे ‘नियोजनबद्ध हेतू’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

खडसे म्हणाजे, कागदपत्रांचा ठावठिकाणाचा चोरट्यांना कळला कसा?
आमदार खडसे हे चोरी झाली त्यावेळी मुंबईत होते मात्र चोरीची माहिती मिळताच ते जळगावात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की केवळ चोरी नाही तर नियोजनबद्ध घटना आहे. माझ्या बेडरूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती, आणि तीच गायब झाली आहेत. म्हणजेच माझ्या घराबाबत माहिती असलेल्या कुणाला याबाबत माहिती होती.





भ्रष्टाचाराशी संबंधित काही कागदपत्रे, जी त्यांनी माहिती अधिकारातून मिळवली होती, तीच चोरीस गेली आहेत. ही साधी चोरी नाही. सोने किंवा रोकडपेक्षा कागदपत्रे आणि सीडीवर त्यांचा डोळा होता, असं खडसे म्हणाले.

पथदिवे बंद, वॉचमन सुट्टीवर
घटनेच्या रात्री 12 वाजून 37 मिनिटांनी परिसरातील पथदिवे बंद करण्यात आले होते. त्या काही क्षणानंतरच चोरी झाल्याचे खडसे यांनी सांगितले. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही. माझ्या घराभोवतीची रेकी आधीच झाल्याची शक्यता आहे. दिवाळी असल्याने वॉचमन सुट्टीवर होता. त्यांनी हेही स्पष्ट केलं की पेन ड्राईव्हमध्ये फक्त गाणी होती, तरीही ती चोरीस गेली आणि सीडीमध्ये वैयक्तिक गोष्टी होत्या.

पोलिसांचा धाक संपला
आमदार खडसे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धत्तीवर यावेळी टीका केली. पोलिसांचा वचक संपला असून ते केवळ हप्ते खाण्यात व्यस्त आहेत. वाळू तस्करी वाढली आहे, असा त्यांनी रोखठोक आरोप त्यांनी केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांकडे तीन बॅग असल्याचे दिसत असल्याचं ते म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !