ट्रोलर्सच्या टीकेनंतर इंदुरीकर महाराजांनी स्पष्टच सांगितले ; कीर्तन थांबवण्याबाबत निर्णय घेणार !


After trolls’ criticism, Indurikar Maharaj clearly stated ; He will take a decision to stop the kirtan! पुणे (14 नोव्हेंबर 2025) : लोक आता माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स करत आहेत. तुम्हाला माझ्यावर टीका करायची असेल तर करा, पण माझ्या मुलांवर टीका नका करू, अशी खंत एका कीर्तनात महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली असून कीर्तन थांबवण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे सुतोवाच करीत खळबळ उडवून दिली. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र समारंभात केलेल्या खर्चावरून अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले. या ट्रोलिंगनंतर वैतागलेल्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून ट्रोलर्सचा समाचार घेतला. तसेच दोन-चार दिवसांत यापुढे कीर्तन करायचे की नाही? याचा निर्णय घेणार असल्याचे ते सांगितले.

तरीही लोकांच्या खातोय शिवया
सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या नव्या किर्तनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते म्हणाले की. 31 वर्षांपासून महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले, तरीही मी लोकांच्या शिव्या खात आहे. माझ्या इतकी कीर्तने कुणी केली नाहीत. माझ्या इतका त्रासही संप्रदायात कुणी काढला नाही, दुसरा असता तर मेलाच असता. मी निर्लज्ज म्हणून जिवंत आहे. माझ्या मागे रोज नवे लफडे आहे. लोक आता रोज मला शिव्या द्यायला लागले आहेत. त्यामुळे मला आता थांबायची गरज निर्माण झाली आहे. दोन-चार दिवसांत मी निर्णय घेणार आहे.



मी 31 वर्ष कीर्तन करत आहे. त्यासाठी राज्यभर फिरतो. आजवर माझ्या 26 स्कॉर्पिओ झाल्या आणि तीन बोलेरो झाल्या. तीस वर्षात तीस गाड्या बदलून झाल्या. आताही मी रोज तीन कीर्तन करतो. महिन्याला 80 ते 82 कीर्तने होतात. मी किती कष्ट केले, याचा विचार लोक करत नाहीत, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले. कीर्तन करत असताना मी संसाराकडे कधी बघितले नाही. आठ-आठ दिवस माझ्या मुलांची गाठ व्हायची नाही. लोक आमच्या कष्टाचा विचार करत नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

मुलीच्या कपड्यावरून कशाला बोलता?
माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत? याच्यावर लोकांच्या कमेंट्स आहेत. यापेक्षा अजून काय वाईट पाहायचे. माझ्या मुलीच्या अंगावर कपडे कसे आहेत? त्यावर चार दिवस बातम्या सुरू आहेत. तुम्ही मला बोल लावा, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे? या कॅमेरे वाल्यांनी चार दिवसात माझे जगणे मुश्कील करून टाकले आहे, अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली.

टीकेच्या वादळातही मोठा वर्ग इंदुरीकर महाराजांसोबत
इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि त्यातून निर्माण झालेला उद्वेग पाहता अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराज विसावा घेतात की आपले कार्य सुरू ठेवतात, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेला भावनिक संदेश आणि महाराष्ट्रातील लाखो भक्तांचा पाठिंबा हे निश्चितच महाराजांसाठी मोठे बळ ठरणार आहे. सोशल मीडियावरील टीकेच्या वादळातही समाजातील मोठा वर्ग इंदुरीकर महाराजांसोबत ठामपणे उभा असल्याचे या सर्व प्रकरणातून दिसून आले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !