लाच प्रकरणात मोठी कारवाई : मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील राजू ढेरेंगे अखेर निलंबित !


Major action in bribery case : Raju Dherenge from Minister Jirwal’s office finally suspended! मुंबई (24 फेब्रुवारी 2026) : लाच प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने टीकेचे धनी ठरलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातून मोठी बातमी समोर आली आहे. लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून राजू ढेरेंगे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. राजू ढेरेंगे हे अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून मंत्री आस्थापनेवर कार्यरत होते. विभागाने तातडीने निर्णय घेत त्यांना सेवेतून निलंबित केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत दोघांवर कारवाई
या कारवाईपूर्वी झिरवाळ यांचे खाजगी सचिव रामदास गाडे यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर आता राजू ढेरेंगे यांच्यावरही कठोर कारवाई झाली असल्याने विभागातील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत सरकार गंभीर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून येतो. 35 हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या लिपिक राजेंद्र ढेरिंगेला मात्र जामीन मिळाला असून मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.


सभागृहात पडसाद उमटण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर हे प्रकरण उघड झाल्याने त्याचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. औषध आणि प्रशासन विभागाशी संबंधित लाचखोरीचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपण चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या विभागातील अधिकार्‍यांवर सुरू असलेल्या चौकशीतून सत्य बाहेर येईल आणि आपण सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

रामदास गाडे कार्यमुक्त
झिरवाळ यांच्या खासगी सचिवावर झालेली कारवाईही या प्रकरणातील महत्त्वाची बाब ठरली आहे. रामदास गाडे यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत, म्हणजेच पशुवैद्यकीय विभागात परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई स्वतः झिरवळ यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याची माहिती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !