राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार


Sunetra Pawar appointed as National President of NCP मुंबई (26 फेब्रुवारी 2026) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. वरळी डोम येथे पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय झाला तर प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतची घोषणा केली.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार ?
महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादा झटत राहिलेले आपण पाहिले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे सगळे स्वप्न आधुरे राहिले आहेत. परंतु, उनके सपने अधुरे नही रहेंगे, हम सब मिलकर उनके सपने और भी उंचाई पर हम सब लेके जायेंगे, असे यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.


सुनेत्रा पवार म्हणाल्या, आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत, हे अजूनही मन मानायला तयार नाही. हा आघात प्रचंड आहे मात्र वास्तव मान्य करायला पाहिजे. यातून आपल्याला बाहेर पडले पाहिजे. कारण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, हा विचार आहे, परिवार आहे. हा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला निर्धाराने पुढे जावे लागणार आहे. मला आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की दादांची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही. पण त्यांनी दाखवलेला विकास मार्ग, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादी आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !