अजितदादांच्या विमानाची अपघातापूर्वी झाडाला धडक : डीजीसीएचा प्राथमिक अहवाल समोर


Ajitdada’s plane hit a tree before crash: DGCA’s preliminary report out मुंबई (28 फेब्रुवारी 2026) : अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावरून संशय कल्लोळ सुरू असतानाच डीजीसीएने आपला प्राथमिक 22 पानांचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार अपघातापूर्वी विमानाची धडक एका झाडाला धडक बसल्याचे नमूद करण्यात आले आहे मात्र अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्राथमिक अहवाल समोर
गत 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास एक महिन्यानंतर डीजीसीएकडून या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.



अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष
विमानाचा समतोल बिघडल्यानंतर ते प्रथम एका मोठ्या झाडाला धडकले आणि त्यानंतर वेगाने जमिनीवर कोसळले, असे अहवालात म्हटले आहे. अपघाताच्या वेळी परिसरात सुमारे दोन हजार मीटर इतकी दृश्यमानता होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अपघातामुळे विमानातील ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ आणि ‘कॉकपीट’ला मोठी झळ पोहोचली आहे. अति उष्णतेमुळे एफडीआर खराब झाला असून त्यातील माहिती मिळवण्यात अडचणी येत आहेत. मात्र, रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला असल्याचे अहवाल सांगण्यात आले आहे.

अमेरिकन कंपनीची मदत घेणार
विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट मधील संभाषण तपासण्यासाठी आता ज्या अमेरिकन कंपनीने ही यंत्रणा बनवली आहे, त्यांची मदत घेतली जाणार आहे. या यंत्रणेतील ‘रॉ डेटा’ सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून तज्ज्ञांची एक विशेष टीम भारतात येणार आहे. त्यानंतरच वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर येऊ शकेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !