प्रवासी जेवणाला उतरताच ओव्हरहिटमुळे शहादा आगाराची बस पेटली

सुदैवाने टळली दुर्घटना : पळसवाडीजवळील धक्कादायक प्रकार


Shahada Agar bus catches fire due to overheating as passengers get off for lunch खुलताबाद – (10 मार्च 2026) : शहादा आगाराची शहादा ते संभाजीनगर बस ओव्हरहिटींमुळे पेटल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर-धुळे हायवेवरील आम्रपाली हॉटेलसमोर दुपारी चार वाजता घडला. यावेळी सुदैवाने बसमधील प्रवासी जेवणासाठी खाली उतरले असताना आग लागल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

काय आहे नेमका प्रकार ?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहादा डेपोची बस (शहादा ते संभाजीनगर) प्रवाशांना घेऊन जात होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास चालक आणि वाहकाने बस पळसवाडी येथील आम्रपाली हॉटेलवर जेवणासाठी थांबवली. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसमधून धूर निघू लागला आणि अचानक आगीने रौद्र रूप धारण केले.



प्राथमिक अंदाजानुसार, ही बस शहादा येथून लांबचा प्रवास करून येत होती. सततच्या प्रवासामुळे इंजिनमध्ये मोठ्या प्रमाणात हिट (उष्णता) निर्माण झाली व बस ओव्हरहीट झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेलवर बस थांबलेली असल्याने आणि वेळीच धूर दिसल्याने प्रवाशांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले.

आम्ही जेवण्यासाठी खाली उतरलो आणि काही वेळातच बस पेटली, जर धावत्या बसमध्ये असे घडले असते तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !