आमदार रोहित पवार यांच्या संघर्षाला मोठे यश : स्व.अजितदादा पवारांच्या अपघात प्रकरणी बंगळूरूत गुन्हा दाखल


Major Victory for MLA Rohit Pawar’s Struggle : Case Registered in Bengaluru Regarding the Accident Involving the Late Ajitdada Pawar बारामती (24 मार्च 2026) : आमदार रोहित पवार यांच्या संघर्षाला मोठे यश आले असून तब्बल दोन महिन्यांनंतर स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173 (1) अंतर्गत ‘झिरो एफआयआर’ गुन्हा नोंदवण्यात आला.

पाच जणांचा ओढवला होता मृत्यू
28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ ‘लियरजेट 45’ हे विमान कोसळले होते. यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. रोहित पवार यांनी आपल्या तक्रारीत हा केवळ अपघात नसून एका मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. विमानाच्या देखभालीत आणि संचालनात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करण्यात आल्याचा दावा तक्रारीत आहे. विमानाचे तांत्रिक रेकॉर्ड्स आणि उड्डाण तासांच्या नोंदींमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.


तांत्रिक गौडबंगाल : उड्डाण तासांची लपवाछपवी?
तक्रारीत नमूद केल्यानुसार, अपघातग्रस्त विमानाने अधिकृत नोंदींमध्ये 4915 तास पूर्ण केल्याचे दाखवले होते, जे 5000 तासांच्या अनिवार्य इंजिन ’ओव्हरहॉल’ मर्यादेच्या अगदी जवळ होते. मात्र, प्रत्यक्षात या विमानाने 8000 तासांहून अधिक उड्डाण केले असावे, असा संशय व्आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या 24 फेब्रुवारीच्या ऑडिट अहवालातही ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीची काही विमाने उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे सांगत ती ग्राऊंड केली होती. तरीही हे विमान वापरासाठी का ठेवले? असा टोकदार प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

रोहित पवारांकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित
रोहित पवार यांनी आजच विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभेत बोलताना रोहित पवारांनी आक्रमक सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी रोहित पवारांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले राज्यात बस स्टॉपवरून चार्जर चोरीला गेला किंवा चप्पल चोरीला गेली तरी गुन्हे दाखल होतात. झाडाच्या फांद्या शेजार्‍याच्या अंगणात गेल्या तरी गुन्हा होतो मग राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो पण पोलीस गुन्हा का नोंदवत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !