देशात लॉकडाऊनची अफवा पसरवल्यास कारवाई : मुख्यमंत्र्यांचा इशारा


मुंबई (29 मार्च 2026) : देशात लॉकडाऊन लागण्याच्या अफवा जर कुणी पसरवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. हा प्रकार म्हणजे अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करण्यासारखा व देशविरोधी काम केल्यासारखा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

इंधनाचा देशात मुबलक साठा
मुख्यमंत्री म्हणाले की, देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा असल्याची असून आपल्या देशाच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशीपमुळे, पंतप्रधानांच्या नीतीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेतली जात आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली.


एलपीजीचा लोड कमी करणार
मुख्यमंत्री म्हणाले की, शहरांमध्ये महानगरच्या माध्यमातून पीएनजी गॅस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. याचं काम जलदगतीने सुरू आहे. त्यासंबंधी सरकारने एक आदेश काढलेला आहे. शहरांवरील एलपीजीचा लोड कमी करून पीएनजीवर भर दिला जाणार आहे. पीएनजीमुळे एलपीजीची भविष्यात समस्या किंवा अडचण येणार नाही.

देशात कोणताही नकारात्मक परिणाम नाही
आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. जरी तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन होणार असल्याच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर कारवाई केली जाणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !