फसवणूक प्रकरणातील महिला आरोपीकडे शारीरीक सुखाची मागणी : अकोल्यातील पोलिस अधिकार्‍याचे निलंबन


अकोला (2 एप्रिल 2026) : फसवणूक प्रकरणातील महिला आरोपीकडे मुलीला पाठवून शारीरीक सुखाची मागणी करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार अकोल्यात घडला आहे. या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकार्‍याला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण
अकोला सायबर पोलिसांनी 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. यामध्ये एका महिला आरोपीचा समावेश आहे. अटकेतील महिलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने ’तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव दहा हजार रुपये देतो’ आणि गुन्ह्यातून वाचविण्यासाठी प्रयत्नही करतो अशी अजब गजब मागणी बुधवारी सकाळी केली. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या कानावर जाताच त्यांनी तातडीने दखल घेत राजेश जाधव याचे तडकाफडकी निलंबन केल.




सायबर पोलिसांची कारवाई
सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळवत सायबर पोलिसांनी तब्बल 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा छडा लावत पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत एका महिला आरोपीचाही समावेश असून, प्राथमिक तपासात या टोळीने विविध माध्यमांतून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. अटकेतील महिला आरोपीशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने अत्यंत अयोग्य वर्तन करत ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला दहा हजार रुपये देतो’ अशी अमानवी व लज्जास्पद मागणी केल्याचा आरोप पुढे आला आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित महिलेला गुन्ह्यातून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आमिषही दाखविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणार्‍या या कृत्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !