पीडीतेला अप्सरा सांगून भुरळ घालत केला अत्याचार ; पोलिसांनी भोंदू अशोक खरातच्या कृत्याचा न्यायालयात वाचला पाढा
नाशिक (2 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर, दुसर्या बलात्कार प्रकरणात त्याला आज न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर करण्यात आले.
बंदोबस्तात सुनावणी
अशोक खरातवर असलेल्या जनक्षोभाचा विचार करता एसआयटीकडून त्याला प्रत्यक्ष कोर्टात आणणे जोखमीचे होते त्यामुळे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने व्हीसीद्वारे सुनावणीला परवानगी दिली. कोर्ट रूममध्ये चार मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या. ज्याद्वारे आरोपी खरात, न्यायाधीश आणि कोर्टातील कामकाज एकमेकांना दिसत होते.



यायालयात सरकारी पक्षाचा खळबळजनक युक्तिवाद
सुनावणीदरम्यान सरकारी वकील अॅड.शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकार्यांनी खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. खरातने आमिष दाखवून पिडितेवर अत्याचार केला ज्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला काही गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. या गोळ्या कुठून आणल्या आणि त्या औषधात काय होते, याचा तपास करणे बाकी आहे.
खरात पिडितेला तू अप्सरा आहेस, असे सांगून भुरळ घालत असे आणि तिचे शोषण करत असे. खरात पिडितेच्या नातेवाईकांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. यामागे त्यांची मालमत्ता हडपण्याचा कट होता का? याचाही तपास डखढ करत आहे.