खोक्या वर्षभरानंतर तुरुंगाबाहेर ; सत्याचा विजय झाला मात्र कुटुंबावर अन्याय झाला : सतीश भोसले
Khokya Released from Prison After a Year; Truth Has Prevailed, Yet an Injustice Has Been Inflicted Upon the Family: Satish Bhosale बीड (3 एप्रिल 2026) : बीडच्या शिरूर कासारमधील बॅटने मारहाण प्रकरण व ढाकणे कुटुंबाच्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात असताना बुधवारी न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. यावेळी खोक्याने सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया देत कुटूंबावर मात्र अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली.
काय म्हणााले खोक्या ?
एका वर्षांमध्ये पूर्ण माझ्या जीवनाची कमाई आणि मी पूर्णपणे बरबाद झालो. आज पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे. घरातील लेकरा बाळाचा आई-वडिलांना राहिला छत नाही. सगळं हिसकावून घेतलं, असं सतीश भोसले म्हणाला. जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले हा त्याच्या शिरूर कासार येथील राहत्या घरी आला. यावेळी वनविभागाने अतिक्रमण म्हणून खोक्याचे घर पाडलेले उध्वस्त झालेला घर संसार पाहून हे पूर्णपणे उध्वस्त झाल्याच्या भावना सतीश भोसलेने व्यक्त केल्या.


सत्याचा विजय झाला
सत्याचा विजय झाला असून माझ्यावर आरोप केले होते. कोर्टात सत्य आहे ते समोर आले. माझी निर्दोष मुक्तता झाली माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. न्याय देवतेने मला न्याय दिला त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. वायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता ही खोटी होती. मला टार्गेट करून माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे, असेही सतीश भोसले म्हणाला.
या कारणास्तवर झाली होती अटक
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच दरम्यान एका व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत बॅटने अमानुष मारहाण करताना खोक्या भोसलेचा व्हिडीओ समोर आला. याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत खोक्याला अटक केली होती. या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यातील पिता-पुत्रांना मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करून हरणाचे मांस घरात आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.






