शेतकर्यांवर संकट आल्यावर संकटमोचक कुठे ? जळगावात खासदार संजय राऊतांचा सवाल
“Where is the ‘Savior’ when farmers face a crisis?” — MP Sanjay Raut questions in Jalgaon. जळगाव (3 एप्रिल 2026) : संकटमोचक हे केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? शेतकर्यांवर जेव्हा संकट येतात तेव्हा हे काही काम करताना दिसत नाही. केवळ पक्ष फोडणे, आमदार, नगरसेवक पळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे का? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जळगाव दौर्यावर आल्यानतंर केला.
काय म्हणाले राऊत ?
खासदार राऊत म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या प्रकरणी संवेदना व्यक्त करणे गरजेचे होते. त्यांनी शेतकर्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली नाही. शेतकर्यांना खूप हाल सहन करावे लागत आहेत. जळगावमधील जे लोकं सत्तेत आहे त्यांच्या संवेदना ठार मेल्या असून ते 24 तास राजकारण करतात, संकटमोचक गिरीश महाजन शेतकर्यांवर संकट आल्यावर कुठे असतात ? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही
संजय राऊत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू आहे. जळगावमध्ये पोलिस गणवेशातील हुकुमशाही आहे, त्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी करत असतात. हळूहळू तुमचाही जोर ओसरणार आहे. शिंदे गटाचे आमदार हे संकटमोचकाच्या संपर्कात आहेत ते पुढची निवडणूक भजपमधून लढवतीर्लें असे वाटते.






