काळ्या जादूच्या बहाण्याने भोंदू बाबाचा महिलांवर अत्याचार


Fraudulent ‘Baba’ Abuses Women Under the Pretext of Black Magic मुंबई (5 एप्रिल 2026) : राज्यात गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरण शांत होत नाही तोच नवी मुंबईतही असाच प्रकार समोर आला आहे.नवी मुंबईतील कळंबोली भागात असणार्‍या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने (काही महिलांवर काळी जादू रण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला असून दोन महिलांनी या भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. राज्यभरातील अशा भोंदू बाबांचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

काळ्या जादूची भीती अन् अत्याचार
अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा लोकांना तत्त्वज्ञान सांगायचा. अल्लाचे महत्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करायचा. कधी गोड बोलून त्यांना वश करायचा तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना आपलंस करायचा. आर्थिक, सामाजिक, शारिरिक, वैवाहिक समस्या दुर करतो असे सांगून तो लोकांना बोलवत असे. आपल्या जाळ्यात फसवून जबरदस्तीने त्याने खालापूर (येथे विवाहित महिलेवर अत्याचार केला तर सांताक्रुझ येथे आई आणि मुलीवर बलात्कार करून दोघींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही प्रकरणात बाबाजानवर गंभीर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली.


अनेक वर्षांपासून लोकांना लावला चुना
खालापूरप्रमाणे कळंबोली येथे सुध्दा महिलांना भेटायला बोलवायचा. आपल्या समस्या सुटतील या आशेपोटी मोठ्या संख्येने लोक त्याला भेटण्यास येत होते. लोकांच्या वाढत्या गर्दी मुळे कळंबोली मधील सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास सांगितले तर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याने परिवारासह येथून पळ काढला. अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षापासून लोकांना चुना लावण्याचे काम करीत होता. गोड बोलून, आल्लातालाचे गारूड करून भक्तांना आपलेसं करीत होता. यामुळे महिलांबरोबर पुरूषही त्याच्या तत्वज्ञानाला बळी पडले आहेत. अनेक पुरूषांकडून त्यांने पैसे उकळलेले आहेत. सद्या दोन महिलांनी तक्रार दिली असली तरी अजून बर्‍याच महिला त्याच्या वासनेच्या शिकार झाल्याचा दावा करण्यात येतोय.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !