हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शोषण ; नाशिकमधील कंपनीला टाळे लागणार !


Exploitation of Hindu Young Women Lured into ‘Love Traps’; Nashik-based Company Faces Closure! नाशिक (12 एप्रिल 2026) : नाशिकच्या आयटी कंपनीत हिंदू तरुणींना आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून नाशिक पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, नाशिकमधील कंपनीला आता टाळे लावण्यात येणार असून मुंबईहून कामकाज चालणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आधी प्रेम नंतर लैंगिक शोषण
नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत (महिलांच्या शोषणाचे अत्यंत भयानक रॅकेट उघडकीस आले आहे. नोकरी करणार्‍या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणे, असा खळबळजनक प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू होता.


वारंवार केला जात होता विनयभंग
आयटी कंपनीत हिंदू मुलींसोबत शरीराला स्पर्श करत त्यांना प्रेमात अकवण्याचा प्रयत्न होत होता. प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिष दाखवली जात होती. तसेच मुलींसोबत अश्लील कृत्य देखील केले जात होते. अश्लील कृत्य करताना फोटो आणि व्हिडिओ काढून कुटुंबाला सांगण्याची भीती घालून धर्मांतराचा प्रयत्न केला जात होता. मीटिंग आणि कामाच्या वेळी पायाने स्पर्श आणि नंतर लॉबीमध्ये शरीराशी झटापट करून महिलांचा विनयभंग केला जात होता.

महिलांच्या श्रद्धेवरही घाव घातला
हे नराधम केवळ शरीरावर नाही तर महिलांच्या श्रद्धेवरही घाव घालत असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू देव-देवतांचा अपमान करून पौराणिक ग्रंथांचा विकृत अर्थ लावून अश्लील शेरीबाजी करत होते. कंपनीत नोकरी करणार्‍या अनेक मुली आणि महिलांना हे त्यांच्या एकट्यासोबत घडत असल्याचे वाटत होते. मात्र, कालांतराने हे सर्व आणि फक्त हिंदू मुलींसोबतच घडत असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई-पुण्याला कंपनीचे स्थलांतर
लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील नामांकित कंपनीला टाळं लागणार आहे. कंपनीमधील कर्मचार्‍यांना आता मुंबई, पुण्यातील इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती आहे. नाशिकमधील धर्मांतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचार्‍यांना नाशिक युनिटमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना एकतर मुंबई-पुण्याला स्थलांतरित व्हावं लागणार आहे किंवा नवीन नोकरी शोधावी लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !