रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : भुसावळमार्गे धावणार अतिरिक्त विशेष गाड्या
Major Relief for Railway Passengers : Additional Special Trains to Run via Bhusawal भुसावळ (15 एप्रिल 2026) : उन्हाळी हंगामातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणार्या अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. या गाड्यांमुळे मुंबई व पुणे येथून पश्चिम बंगालमधील सांतरागाछीपर्यंत थेट रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.
या गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा
लोकमान्य टिळक टर्मिनस-सांतरागाछी (01127/01128) ही विशेष गाडी दिनांक 24 एप्रिल 2026 व 01 मे 2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.15 वाजता सुटणार असून, दुसर्या दिवशी 07.00 वाजता सांतरागाछी येथे पोहोचेल.

परतीच्या फेर्या 25 एप्रिल व 02 मे 2026 रोजी सांतरागाछी येथून 15.00 वाजता सुटून तिसर्या दिवशी 00.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचतील.
या गाडीला भुसावळसह अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, रायपूर, बिलासपूर आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सांतरागाछी (01041/01042)
ही गाडी दिनांक 17 एप्रिल व 24 एप्रिल 2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 11.50 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी 20.30 वाजता सांतरागाछी येथे पोहोचेल.
परतीच्या फेर्या 19 एप्रिल व 26 एप्रिल 2026 रोजी सांतरागाछी येथून 05.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी 12.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचतील. या गाडीचाही भुसावळ स्थानकावर थांबा आहे.
पुणे-सांतरागाछी (01429/01430) ही गाडी दिनांक 15 एप्रिल व 22 एप्रिल 2026 रोजी पुणे येथून 10.00 वाजता सुटून दुसर्या दिवशी 21.00 वाजता सांतरागाछी येथे पोहोचेल. परतीच्या फेर्या 17 एप्रिल व 24 एप्रिल 2026 रोजी सांतरागाछी येथून 15.45 वाजता सुटून तिसर्या दिवशी 05.15 वाजता पुणे येथे पोहोचतील. या गाडीला मनमाड, भुसावळ, अकोला, नागपूर आदी स्थानकांवर थांबे आहेत.
पुणे-सांतरागाछी (01441/01442) ही गाडी दिनांक 17 एप्रिल व 25 एप्रिल 2026 रोजी पुणे येथून 10.00 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी 21.00 वाजता सांतरागाछी येथे पोहोचेल. परतीच्या फेर्या 19 एप्रिल व 27 एप्रिल 2026 रोजी सांतरागाछी येथून 15.45 वाजता सुटून तिसर्या दिवशी 05.15 वाजता पुणे येथे पोहोचतील. या गाडीचाही भुसावळ मार्गे प्रवास होणार आहे.
भुसावळ जंक्शन ठरतेय महत्त्वाचे केंद्र
या सर्व विशेष गाड्यांमुळे भुसावळ स्थानकाचे महत्त्व आणखी वाढले असून, उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट पूर्व भारतात जाण्याचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करणार्या नागरिकांना या गाड्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे.


