ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत
टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी शोभा यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत
जळगाव (20 एप्रिल 2026) : जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भगवान परशूराम पालखी सोहळा भव्य स्वरूपात साजरा झाला. पालखीचे घरोघरी उत्स्फुर्त पूजा करून स्वागत करण्यात आले. टाळ,मृदंगाच्या गजराने वातावरण भक्तीमय झालेले दिसून आले.
निवृत्ती नगरातील श्री हनुमान मंदिर येथून सायंकाळी 6 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. तेथून टाळ,मृदंग,ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरणात भगवान परशुरामाचा जयजयकार करत ही शोभा यात्रा एसएमआयटी कॉलेज व तेथून प्रेम नगरातील श्री सप्त शृंगी मंदिरात पोहचली. रस्त्यात ठिकठिकाणी घरोघरी श्री परशुराम पालखीचे पूजन व भव्य स्वागत केले जात होते.

प्रसंगी चिमुकले राम मंदिराचे प.पू.श्री दादा महाराज जोशी,जळगांव जनता बँकेचे सतीश मदाने, वेद पाठशाळा प्रमुख प.पू.श्री देवेंद्र गढीकर गुरुजी ,हभप मुकुंद महाराज धर्माधिकारी,ि शवसेना जिल्हा उप संघटक मुरबाड तथा ब्राह्मण संघर्ष समिती समन्वयक सौ.अर्चना सुरडकर,भाजपा स्विकृत नगरसेवक सुभाष शौचे,ब्रह्मश्री संस्थेच्या संस्थापक महिला अध्यक्ष रेखाताई कुळकर्णी,अजय कुळकर्णी, पालखी प्रमुख प्रसाद पटवे तसेच व्यासपीठावर विविध क्षेत्रतील मान्यवर उपस्थित होते.
श्री सप्तश्रृंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. व्यासपीठावरून समाज बांधवांना मार्गदर्शन करताना प.पू.श्री दादा महाराज यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज हा समाजाचा आरसा आहे. आदर्श आहे त्यांनी याचे भान ठेवून परिवारातील संस्कारा कडे कटाक्षाने लक्ष देवून योग्य असे आचरण केले पाहिजे,परिवार सक्षम, ज्ञानी, विनम्र सेवाभावी कसा होईल याकरता प्रयत्न केले पाहिजे. सनातन धर्माचे पालन करून समाज संघटित होण्यासाठी कार्य झाले पाहिजे ,आपसी भेद भाव न बाळगता समाज एकसंघ होण्यासाठी,सुरक्षित होण्या साठी लक्ष देणे अपेक्षित आहे. तर अर्चनाताई सारूडकर यांनी मुलींना आता घाबरून राहण्याचे जग नाही तर अन्यायाविरूध्द लढा देण्याची वेळ आली असून अन्याय झाल्यास मदतीसाठी धावून येण्याचे आश्वासन दिले.पालकांनी देखिल आपले संस्कार जोपासत पाल्याकडे लक्ष द्यावे, जीवनात पैसाच सर्व काही नसते तर संस्कार आणि इभ्रतही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचीत उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक शौचे यांचा देखिल सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी ब्रम्हश्रीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला वेद पाठशाळेतील विदयार्थ्यानी रामरक्षा पठण केले.


