मंत्री संजय सावकारे यांचा दमदार पाठपुरावा : कुर्‍हेपानाचे उपसा सिंचन योजनेला तत्वता मान्यता

शेतकर्‍यांसाठी मोठी उपलब्धी : साडेतीन हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार


Minister Sanjay Savkare’s Vigorous Follow-up: Kurhepan Lift Irrigation Scheme Receives ‘In-Principle’ Approval भुसावळ (20 एप्रिल 2026) : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील कृषी विकासाला नवे बळ देणार्‍या कुर्‍हेपानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. 1 व क्र. 2 या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे 281 कोटींची तत्वत: मान्यता मिळाली आहे. हा निर्णय शेतकरी हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या योजनेमुळे सुमारे साडेतीन हजारांहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणारी ही योजना ठरणार आहे. भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा यासाठी मोलाचा ठरला आहे.

शेती उत्पादन क्षमतेला मिळणार चालना
कुर्‍हा उपसा योजनेंतर्गत कुर्‍हेपानाचे भागातील 1650.720 हेक्टर, खंडाळे भागातील 412.794 हेक्टर व मोंढाळे 805.19 हेक्टर तसेच शिंदी भागातील 888.120 हेक्टर गावातील एकूण तीन हजार 756.82 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.


शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणार : मंत्री संजय सावकारे
कुर्‍हेपानाचे उपसा सिंचन योजनेला शासनाने तत्वता मान्यता दिली असून या योजनेमुळे सिंचन सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होऊन शेती उत्पादन क्षमतेत मोठी चालना मिळेल व शेतकर्‍यांच्या आर्थिक सक्षमीकरणास भक्कम आधार मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण योजनेला तत्वत: मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आपण मपूर्वक आभार मानतो, असे मंत्री संजय सावकारे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !