वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम

ओपीडी पेपरच्या मागच्या कोर्‍या कागदावर ’मोदी पर्वाचे’ 12 ऐतिहासिक निर्णय !


वरणगाव (17 जून 2026) : वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ.नितु पाटील आणि डॉ.रेणुका पाटील यांचे वरणगाव येथील ‘वासुदेव नेत्रालय’ आपल्या नाविन्यपूर्ण जनजागृती मोहिमेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशात 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, नेत्रालयाने रुग्णांना दिल्या जाणार्‍या ओपीडी केस पेपरच्या मागील कोर्‍या बाजूचा अत्यंत कल्पक वापर केला आहे. कागदाचा अपव्यय टाळून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षांत घेतलेले 12 महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय छापून एका मोठ्या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेला सुरुवात केली आहे.

कोर्‍या जागेवर छापली ऐतिहासीक माहिती
प्रेस्क्रिपशनच्या मागील कोर्‍या बाजूचा ‘राष्ट्रहितासाठी’ वापर!
हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांना मिळणार्‍या विविध चिठ्ठ्या किंवा माहिती पत्रकांची मागची बाजू सहसा कोरी असते, ज्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हीच कोरी बाजू आता देशहिताच्या माहितीचे माध्यम बनली आहे. वासुदेव नेत्रालयाने या कोर्‍या बाजूवर मोदी सरकारच्या 12 वर्षांतील ऐतिहासिक निर्णयांची माहिती छापली आहे. त्यात पंतप्रधान जन धन योजना स्वच्छ, भारत अभियान, सर्जिकल स्ट्राइक, नोटबंदी, वस्तु आणि सेवा कर, आयुष्मान भारत योजना, कलम 370 रद्द करणे, राम मंदिर निर्माण आणि विकास, नागरिकतत्व दुरुस्त कायदा, डिजिटल इंडिया, उत्पादन वर आधारित प्रोत्साहन योजनेचा समावेश आहे.

नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव
वैद्यकीय व्यवसायापलीकडे जाऊन राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्याचा वासुदेव नेत्रालयाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यामुळे रुग्णांना उपचारासोबतच देश कशा प्रकारे बदलत आहे, याचीही मौल्यवान माहिती मिळते, अशा शब्दांत वरणगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

सामाजिक जनजागृतीचा ‘वासुदेव पॅटर्न’!
वासुदेव नेत्रालयाने अशा प्रकारे जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आपल्या पत्रकांच्या माध्यमातून खालील महत्त्वाच्या विषयांवर थेट जनतेशी संवाद साधला आहे. ‘एकही फूलराणी आता जळणार नाही, जल प्रतिज्ञा, अवयव दान-जीवन दान, विश्वभरातील श्रीराम भक्तांना निवेदन आदी विषयाबद्दल सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉ.नितु पाटील म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !