अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू विकार तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश


A young man battling for life after an accident gets a new lease on life. जळगाव (23 जून 2026) : चाळीसगाव तालुक्यातील 35 वर्षीय तरुणाला कारच्या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील मेंदू विकार तज्ज्ञांनी वेळेवर उपचार व तातडीची शस्त्रक्रिया करून या तरुणाला नवजीवन दिले आहे. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असलेले सुरेश नामक 35 वर्षीय तरूण पायदळ जात असतांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. दुखापत इतकी गंभीर होती की त्याचे हात-पाय हालचाल करणे बंद झाले होते. तसेच तो डोळेदेखील उघडू शकत नव्हता. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.

तज्ज्ञांकडून तपासणीअंती निदान
रूग्णालयात दाखल होताच मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड व त्यांच्या टीमने रूग्णाची तपासणी केली. त्यावेळी रूग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तात्काळ कृत्रिम श्वासोच्छ्वास (व्हेंटिलेटर) देण्यात आला. त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅन तपासणीत डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर (स्कल फ्रॅक्चर) झाल्याचे तसेच परायटल भागात एपिड्युरल हेमेटोमा (इडीएच) म्हणजेच मेंदूवर रक्ताची गाठ तयार झाल्याचे आढळून आले. मेंदूवर वाढत असलेल्या दाबामुळे रूग्णाचा जीव धोक्यात आला होता.


प्रसंगावधान ओळखून शस्त्रक्रिया
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. विपूल राठोड यांच्या नेतृत्वाखालील टीमने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील रक्तस्त्राव थांबविण्यात आला तसेच साचलेले रक्त काढून मेंदूवरील दाब कमी करण्यात आला.शस्त्रक्रियेनंतर रूग्णावर अतिदक्षता विभागात विशेष उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. निशा, भूलशास्त्र तज्ञ डॉ. शितल फेगडे यांनी सहकार्य केले. डॉक्टर, आयसीयूतील शालीक चौधरी, नर्सिंग कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचार्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रूग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. सध्या रूग्ण पूर्णपणे शुद्धीवर असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.

वेळीच झालेल्या शस्त्रक्रियेने वाचले प्राण
डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर पहिल्या काही तासांतील उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. या रूग्णाच्या बाबतीत सीटी स्कॅनमध्ये एपिड्युरल हेमेटोमा आणि कवटीचे फ्रॅक्चर आढळून आले होते. तातडीने शस्त्रक्रिया केल्यामुळे मेंदूवरील दाब कमी करता आला आणि रूग्णाचा जीव वाचविणे शक्य झाल्याचे डॉ.श्रृती खंडागळे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !